पुन्हा राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले ; पंचगंगा परत धोक्‍याच्या पातळीकडे जाण्याची शक्यता

Again the two automatic gates of Radhanagari opened
Again the two automatic gates of Radhanagari opened
Updated on

कोल्हापूर - काल बंद झालेले राधानगरी धरणाचे दोन दरवाजे आज दुपारी एकच्या सुमारास पुन्हा उघडले आहेत. तीन आणि सहा क्रमांकाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले असून त्यातून 4 हजार 256 क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 6 इंचावर कायम आहे. जर धरण क्षेत्रात पाऊस वाढला आणि धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडले तर पंचगंगा पुन्हा धोक्‍याच्या पातळीकडे जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

तीन ते सहा ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस रोज होत होता. त्यामुळे पचंगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांपेक्षा अधिक पोचल्यामुळे ती धोक्‍याच्या पातळीवरून वाहू लागली होती. यामध्ये धरणाचे पाणी सोडले नव्हते तरीही अतीवृष्टीमुळे महापूर आला होता. त्यानंतर राधानगरी धरणातील पाणीसाठी अधिक झाल्यामुळे चार स्वयंचलित दरवाजे उघडले होते. त्यातून चार हजारांहून अधिक क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग झाला. त्यापैकी काही पाणी भोगावतीनदीसह पंचगंगेत येत होते. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यानंतर ही धोकापातळी कायम होती.

राधानगरीचे दोन दरवाजे दोन दिवसापूर्वी तर काल दोन दरवाजे बंद झाल्यामुळे काही प्रमाणात महापुराची स्थिती कमी होण्याचे संकेत मिळाले होते. आज दुपारी एकच्या सुमारास पुन्हा एकदा तीन आणि सहा क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे त्यातून एकूण 4 हजार 256 क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. साधारण 12 तासांत हे पाणी पंचगंगेला मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापुराची धास्ती कमी होत असतानाच धोक्‍याच्या पातळीवरून इशारापातळीकडे जाणारी पंचगंगा पुन्हा धोक्‍याच्या पातळीकडे जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Kolhapur farmers oppose expressway project
Marathi News Esakal
www.esakal.com